गायक केके यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढलं ; कोलकात्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद
प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ ऊर्फ केके (५३) यांचे कोलकात्यात एका लाइव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमानंतर मंगळवारी रात्री निधन झाले. केके यांच्या जाण्याने व्हाइस ऑफ लव्ह हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. केके यांनी मंगळवारी रात्री नजरूल मंचचा संगीत कार्यक्रम केला. त्यानंतर ते हॉटेलच्या रूमवर गेले.
Singer KK has died in Kolkata: officials
— Press Trust of India (@PTI_News) May 31, 2022
गायक केके यांच्या मृत्यूबाबत कोलकातामध्ये सस्पेन्स वाढला आहे. त्याच्या कपाळावर आणि ओठांवर जखमेच्या खुणा आढळल्या. यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस केकेच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. हा कार्यक्रम गुरुदास महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता आणि या फेस्टचे नाव देण्यात आले होते – उत्कर्ष २०२२. हा कार्यक्रम नजरुल मंचमध्ये आयोजित करण्यात आला होता.
गायक केके यांचे कुटुंबीय आज कोलकाता येथे येत आहेत. केकेचे कुटुंबीय आज कोलकाता येथे येत आहेत. याप्रकरणी नवीन मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगीतकाराचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
माजी मंत्र्यांच्या घरात शिरला चोर ; बंदुकीचा धाक दाखवत केली ५० हजारांची मागणी
केके यांच्या मृत्यूवर प्रश्न
येथे गायक केके यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो योग्य नाही, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. दिलीप घोष पुढे म्हणाले की एसीशिवाय आणि एवढ्या गर्दीत कसे काम करावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याने एसी बंद असल्याचे त्यांनी सांगितले. या कारणामुळे त्यांची तब्येत बिघडली की काय, हे माहीत नाही, लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोलकाता येथील कामगिरीनंतर निधन
प्रसिद्ध बॉलिवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. ते केके या नावाने प्रसिद्ध होते. केके 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. अधिकार्यांनी सांगितले की दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते जेथे केके सुमारे एक तास गाणे गाऊन हॉटेलमध्ये परतले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते.
वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, गायकाला दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “केके यांना रात्री १० वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. आपण त्यांच्यावर उपचार करू शकलो नाही हे दुर्दैव आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की त्यांना संशय आहे की गायकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.
कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बुधवारी त्याचे शवविच्छेदन केले जाईल, त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
गाजलेली गाणी
गायक- संगीतकार म्हणून ते परिचित होते. त्यांनी हिंदीत २०० हून अधिक गाणी गायली होती. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रप टातील त्यांची गाणी खूप गाजली.
तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही (हम दिल दे चुके सनम), तुने मारी एन्ट्रीया तो दिल में बजी घंटीया (गुंडे), डोला रे डोला (देवदास), तूही मेरी शब है (गॅगस्टर) ही त्यांची काही अतिशय गाजलेली गाणी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम, मराठी आणि बंगालीसह अन्य भाषांत त्यांनी गाणी गायली होती.