माझा फोन टॅपिंग सुरू आहे ; खा. संजय राऊत यांचा आरोप
फोन टॅपिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा भाजप वर गंभीर आरोप केले महाराष्ट्रात जो पॅटर्न राबवला गेला कोण टायपिंग तोच गोव्यातही राबवला जाईल अशी टीका त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या हालचाली सुरू होत्या त्यानंतर फोन टॅपिंग सुरू झाली, आम्ही कोणाशी बोलत आहोत. कुणाला भेटत आहोत, ही माहिती पोलीस अधिकारी कोणाला देत होते हे सर्वांनाच माहिती आहे. अशाप्रकारचे पॅटर्न इतर राज्यातही वापरले जात आहे.
दोन दिवसापूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत त्यांनीदेखील भीती व्यक्त केली की आमचे फोन टॅपिंग होत आहे.
त्यांनी काल गोव्यात पत्रकार परिषद घेतली आमची काँग्रेस नेत्यांचे फोन टॅपिंग होत आहे. फोन टॅपिंग प्रकरण सुरू आहे हा महाराष्ट्र पॅटर्न असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र पॅटर्नचे प्रमुख होते तेच गोव्याचे निवडणूक प्रमुख होते. अशी टीका देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. यामुळे आम्ही सर्व जण काळजी घेत आहोत.
केंद्रीय तपास यंत्रणा आत्ता ही माझे फोन टॅपिंग करत आहे मात्र मी माझा फोन बदललेला नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. विरोधकांना जनतेच्या प्रश्नावर बोलायचं नाही केवळ ठाकरे सरकारला बदनाम करायचं.
राज्यपाल महोदय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे काम करत आहे हे या राज्याच्या देशाच्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला अशोभनीय आहे अशी टीका त्यांनी केली.