माझी लाडकी बहीण योजनेत भेटणार फक्त रुपये १/- ?
महाराष्ट्र न्यूज : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून अर्ज प्रक्रिया सुरू असून पहिला हप्ता कधी येणार? दरम्यान, पहिल्या हप्त्याची नेमकी तारीख आता समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकार या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १७ ऑगस्ट रोजी पाठवणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात पात्र महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठवले जाणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांद्वारे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकत्रितपणे 3000 रुपये पाठवले जातील.
UPI द्वारे पेमेंट करण्याची पद्धत बदलणार, आता पिन न पाहता होणार काम!
मराठी अर्ज फेटाळले जाणार नाहीत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मराठीतून भरलेले अर्ज फेटाळले जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मराठीत अर्ज सादर करणाऱ्या कोणत्याही महिलेचा अर्ज फेटाळला जाणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले होते.
‘लाडका मुख्यमंत्री सुद्धा आलं पाहिजे’ – बच्चू कडू
1 रुपये तांत्रिक पडताळणीसाठी पाठवले जातील,
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 1 कोटीहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांची चौकशी सुरू आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. याआधी, संपूर्ण प्रक्रियेच्या तांत्रिक पडताळणीसाठी काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा केला जाईल. हा एक रुपयाचा सन्मान निधी असणार नाही. तांत्रिक पडताळणीसाठी हा एक रुपया काही महिलांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे.
Latest: