मुसावाला प्रकरणातील शुटर संतोष जाधव पुणे पोलिसांच्या ताब्यात
सिद्धू मुसेवाला प्रकरणातील पुण्यातील दुसरा आरोपी संतोष जाधव याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचं समोर आलं आहं. त्यापैकी पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावंही समोर आली होती.
हेही वाचा :
- सिद्धू मुसावाला प्रकरणात धक्कादायक माहिती, पुण्यातील सौरभ महाकालने केला मोठा खुलासा
- शेवगाचे भरगोस उत्पन्न मिळवून देणारे नवीन वाण
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील शूटर संतोष जाधव याला पुणे पोलिसांनी अटक केली. अशी माहिती एका अधिकाऱ्याने आज (सोमवारी) दिली. जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातही वॉन्टेड संशयित होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून प्रकरणातील संशयित जाधव याच्या साथीदारालाही अटक केली आहे.
संतोष जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. 20 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी जाधवच्या टोळीतील आणखी एकाला देखील अटक केली आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण
मानसा जिल्ह्यात शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.
मात्र यात दररोज नवीन खुलासे होत गेले. पाकिस्तानच्या एका खालिस्तानी आतंकवाद्याच नाव देखील या प्रकरणात सर समोर आले आहे. रविंदर सिंग उर्फ रिंडा याचे नाव समोर आले आहे. मूसेवाला खून प्रकरणात पुणे पोलिसांनी पकडलेल्या महाकालने चौकशीनंतर अनेक खुलासे केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर महाकाल याने सांगितले आहे की, लॉरेन्स बिश्नोई हरविंदर सिंग उर्फ रिंडा यांच्यासाठी काम करतो असे चौकशीत स्पस्ट झाले आहे.