क्राईम बिटमहाराष्ट्र

कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या, स्वताःही केली आत्महत्या

Share Now

नांदेड: शहरात एक धक्कादायक प्रकार घडला, पतीने पत्नीची हत्या करून स्वताः आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून हि घटना घडली असून घटनेने संपूर्ण गावात हाळहाळ व्यक्त होत आहे. रंजना भारत तोटडवार आणि भारत नामदेव तोतडवार असे मृतांचे नाव आहे. दोघेही नांदेड जिल्ह्यातील बेळकोणी गावात राहत होते.

हाती आलेल्या माहिती नुसार, पतीने पत्नीच्या अंगावर कुऱ्हाडीने वर केला, पत्नीचा जीव गेला कळताच त्याने शेतात धाव घेतली आणि तिथे असलेल्या लिंबाच्या झाडाला लटकून आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. मात्र दाम्पत्याचा एकाएकी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून हत्यामध्ये वाढ झाल्याचे गेल्या एक दोन आठवड्यात दिसून येत आहे, काल नागपुरात एका पत्नीने पतीचा हत्या केल्याची घटना घडली होती. पती दारूपिऊन त्रास देत होता म्हणून गाळा आवळून पत्नीने पतीचा जीव घेतला, त्या आधी पातीला लोखंडी खांबाला बांधून मारहाण देखील केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *