कोरोना अपडेट

मुंबईत संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी निर्बंधात बदल

Share Now

मुंबईत पुन्हा नियमांत बदल संध्याकाळी ५ तर पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी, बागा, सार्वजनीक ठिकाणी जाण्यास नारिकाना मनाई करण्यात आली.
दोन दिवसापासून नव्या वर्षाचं स्वागत घरी राहूनच करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या नजरेसमोर ठेऊन मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेण्यात आला. संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान सार्वजनिक स्थळे, चौपाटी तसेच गार्डनमध्ये फिरण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी गघालण्यात आली आहे.
त्याचबरोबर मुंबईत ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आज या नियमावलीत फेरबदल करून १५ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी असणार आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दली आहे.
शहरात काही घातपात घडूनये यासाठी मुंबईत चोख बंदोबस्त करण्यात आला आहे, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाची नवी नियमावली जारी करण्यात आली, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अन्यथा कारवाईस सामोरे जावं लागेल.
नियमाचे उल्लंघन केल्यास महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलिस पथक, पोलिस ठाण्याना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *