मुंबईत हाय “अलर्ट” वर
नवीन वर्षाच्या (new year) स्वागतासाठी लोकांनी वेगवेगळे प्लॅन केलेले असतात, मात्र यावर्षी देखील कोरोनाच संकट राज्यावर आहे, याच पार्श्ववभूमीवर मुंबईत ३१ डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले, त्याचबरोबर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने मुंबईत हायअलर्ट(mumbai highalert ) जारी केले आहे.
३१ डिसेंबरला दहशदवाद्याचा धोका असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत सुरेक्षेच्या कारणास्तव हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे उद्या मुंबई पोलिसांच्या(mumbaipolice) सुट्ट्या देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण मुंबई कायम दहशदवाद्याच्या निशाण्यावर असणारे शहर आहे. शहरातील सार्वजनिक मालमत्ता दहशदवाद्याच्या निशाण्यावर असण्याची शक्यता असते .
सामान्य नागरिकांनी घाबरून न जात सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलीस आयुक्त चैतन्य यांनी केले तसेच ATS ,BDDS , क्राईम ब्रांच याना देखील अलर्ट देण्यात आला आहे.