मुलांच्या लसीकरणाची बुकिंग १ जानेवारी पासून, अशी कराल नोंदणी !
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने येत्या नवीन वर्षाच्या सुरवातीला वय वर्ष १५ ते १८ मुलांचे लसीकरण सुरू सुरू करण्याची घोषणा केली आहे, भारतातील लहान मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारी पासून सुरवात होईल. परंतु या अल्पवयीन मुलांच्या लसीकरणाची नोंदणी कशी करावी हा प्रश्न सर्वच पालकांना पडला आहे.
३ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या लसीकरणाची नोंदणी Co Win अँपद्वारे करण्यात येईल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की, एक जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्षाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
अनेक देशात ओमायक्रॉनचे संकट आले आहे. ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्श्ववभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याची गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.
cowin.gov.in