मुकेश अंबानी करताय संपत्तीची वाटणी करण्यासाठीचा खास अभ्यास
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागीदार मुकेश अंबानी आपल्या संपत्ती आणि उद्योगाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि पुढे चालून मुला मुलींमध्ये संपत्तीच्या वादातुन भांडण होऊ नये म्हणून एक प्लॅन आखत आहे.
सध्या मुकेश अंबानी 64 वर्षाचे आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुली मुलांमध्ये ते 208 अब्ज अमेरिकन डॉलरचे बिझनेस वाटून देणार आहे. ज्यामुळे धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात झालेल्या वादाची पुनरावृत्ती होणार नाही. याची काळजी मुकेश अंबानी घेत आहे. त्याचबरोबर जगभरातील अब्जाधीशांनी त्यांच्या संपत्तीची वाटणी आणि वारसा कशी केली. याचा अभ्यासही मुकेश अंबानी करत आहे.
कोणते प्लॅन मुकेश अंबानी यांना आवडलेत
1. वॉलमार्टचे वॉल्टन यांचा प्लॅन
जगातील सर्वात श्रीमंत वॉलमार्टचे सॅम वॉल्टन यांनी त्यांच्या मृत्यू नंतर बिझनेस ट्रान्सफर करण्यासाठी मॅनेजमेंट केले होते. त्यांनी 1988 मध्येच त्यांचा सर्व व्यवसाय मॅनेजर यांच्या हाती देण्यात आला होता. त्यानंतर या बिझनेस वर नजर ठेवण्यासाठी एका संचालक मंडळाची स्थापना करण्यात आली होती. आणि या मंडळात सॅम वॉल्टन यांचा मुलगा रॉब वॉल्टन आणि त्यांचे पुतणे स्टुअर्ट वॉल्टन यांनाही ऍड करण्यात आले होते. त्यानंतर 2015 मध्ये सॅम वॉल्टेन यांचे नात जावई ग्रेग पॅनर यांना कंपनीच्या चेअरमन पदी नियुक्त करण्यात आले. परंतु शेअरहोल्डर्सची कुटुंबातील सदस्यांना प्रचंड पसंदी असल्यामुळे त्यांच्या या निर्णयावर भरपूर टीका करण्यात आली. सॅम वॉल्टन यांनी 1953 मध्ये म्हणजेच मृत्युच्या 40 वर्षांपूर्वी वारसदार निवडण्याच्या प्रक्रियेवर काम सुरु केलेले होते. त्यानंतर बिझनेसचा 80 टक्के भाग त्यांच्या 4 मुलांमध्ये वाटून देण्यात आला होता.
2. होल्डिंग ट्रस्टमध्ये टाकणेमुकेश अंबानी कुटुंबाची होल्डिंग एका ट्रस्ट मध्ये टाकण्यास इच्छुक आहे. खरं तर त्याच ट्रस्टच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीला नियंत्रित केले जाते. मुकेश अंबानी ज्या ट्रस्ट मध्ये होल्डिंग टाकण्यास इच्छुक आहे त्यामध्ये मुकेश अंबानीसह नीता अंबानी आणि त्यांच्या तीन मुलामुलीचा वाटा त्याचबरोबर त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींना या प्लॅनिंग नुसार बोर्डामध्ये देखील समाविष्ट करण्यात येणार आहे. या ट्रस्टच्या मंडळाचे ते सदस्य असतील.
काय होता मुकेश अंबानी आणि अनिल अंबानीच्या संपत्तीचा वाद
धीरूभाई अंबानी यांचे निधन 2002 मध्ये झाले होते. निधनानंतर कोणाला कशा पद्धतीने वारसा सोपवायचा याचा प्लॅन केलेला नव्हता. निधनानंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात वाद झाले. त्यावेळी रिलायन्सचे 2 तुकडे करून मुकेश अंबानीला रिलायन्स चा मोठ्या तर अनिल अंबानीला छोट्या कंपन्या देण्यात आल्या. मुकेश अंबानी यांना सर्वात महत्वाची अशी रिलायंस इंडस्ट्रीज मिळाली. तर अनिल अंबानी यांना कम्युनिकेशन, पॉवर आणि कॅपिटल बिझनेस मिळाले. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम आणि रीटेल बिझनेस सुरू केला. आणि जिओ टेलिकॉम उभारून त्याला देशातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क कंपनी बनवले. सध्या बाजारात जिओची किंमत 6 लाख कोटी रुपये आहे. परंतु अनिल अंबानी यांनी काही खास केले नाही.