एमपीएसी विद्यार्थ्यांना खुशखबर !
राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएसी परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना वयोमर्यादते वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोविड १९ च्या आजारामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षा रखडलेल्या होत्या. या कालावधीत MPSC आणि सरळ सेवा भरतीच्या प्रक्रिया होऊ शकल्या नाही यामुळे आता नव्याने जाहिराती येत आहेत परंतु वय वाढल्यामुळे काही विध्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहू नये म्हूनन परीक्षार्थीचे हित लक्षत घेऊन सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी दोन वर्ष वाढीव संधी देण्याची मागणी विद्यार्थिनी केली त्यावर महाविकास आघाडीने विध्यर्ह्याच्या बाजूने विचार करून वयाची अट शिथिल करून एक वर्ष वाढवून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वयोमर्यादा वाढवण्यास मर्यादा दिली यामुळे अनेक विद्यार्थाना फायदा होणार, असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.