MPSC 2019 उत्तीर्ण विद्यार्थ्यांनो! आनंदाची बातमी …४१३ विध्यार्थ्यांना नियुक्तीपत्र !
जे विद्यार्थी २०१९ मध्ये उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या बॅच मध्ये उत्तीर्ण ४१३ विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले आहेत. १७ जानेवारी पासूनप्रशिक्षणाची सुरुवात होत आहे. असं म्हणण्यास हरकत नाही, की येणार वर्ष या विद्यार्थ्यांना साठी आनंद घेऊन येणार आहे.
२०१९ च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्ती मिळावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. उत्तीर्ण होवून २ वर्ष झाले तरी सुद्धा नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली होती. विद्यार्थ्यांनी देहदाहनाचा इशारा दिला होता. उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तहसीलदार, गटविकास अधिकार अश्या ४१३ पदांचा समावेश होता.
राज्यात एवढे गंभीर प्रश्न असूनही सरकार लक्ष देत नाही आणि निर्णय घेत नाही अशी टीका विरोधकांनी केली होती. पेपर फुटी,अनेक विभागातील भरतींमध्ये होणारे भ्रष्टाचार, स्पर्धा परीक्षेसाठी तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे सगळे प्रश्न दुर्लक्षित होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं होत. असं म्हणता येईल या सगळ्यामध्ये शेवटी सरकारने एक निर्णय घेतला, आणि कुठेतरी दिलासा देणारी बातमी ठरली.
Pic cradit – india.[lock][/lock][lock][/lock]com