MPSC कडून मुलाखत आणि शारीरिक चाचणीच वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षांनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक आयोगाने जाहीर केलं आहे. यापूर्वी मुख्य परीक्षा पार पडल्या होत्या. त्यानंतर आता मुलाखतींच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्य लोकसेवा आयोगाने यासंदर्भात आज परीपत्रक काढलं आहे. त्यानुसार जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद, लातूर आणि कोल्हापूर केंद्रावरील उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यानुसार शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आयोगाच्या उपसचिवांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *