फिल्मी स्टाईल थरार। कसारा घाटात दरोडेखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
इगतपुरी : कसारा घाटात बंद पडलेल्या ट्रकच्या चालकाला मारहाण करुन लूट केल्याची घटना समोर अली आहे. सुमारे अर्ध्यातासात फिल्मी स्टाईल गदारोळ सुरु होता. या सर्व प्रकारात पोलिसांनी मुख्य आरोपीला पडले. झटापटीत एक कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तिघा दरोडेखोरांपैकी मुख्य सूत्रधार असलेल्या विजय रामदास ढमाळे याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले. पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवले होते. त्यामुळे ढमाळेने गायकवाडांवर धारदार हत्याराने हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले. मात्र अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले आणि कसारा पोलिसांच्या ताब्यात दिले.
नाशिक दिशेहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच ४० बी जी ६१६५ बंद पडला होता. रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत असताना गाडीचा पाटा तुटल्यामुळे महामार्ग पोलिसांच्या मदतीने चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून ठेवला होता. रात्रीच्या वेळी गॅरेज खुले मिळणार नाही म्हणणं महामार्ग पोलिसांनी ट्रक चालकाला मोबाईल नंबर दिला आणि ते गस्तीसाठी निघून गेले. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ट्रकजवळ पल्सर बाईकवर तिघे जण आले. पूर्ण काळे कपडे परिधान केलेल्या या तिघा तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवलं. दादागिरी करत ट्रकवर दगडफेक केली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत महामार्ग पोलिसांना कॉल केला. मात्र तोपर्यंत तिघा दरोडेखोरांनी ट्रकमध्ये चढून ट्रक चालक विकी खोब्रागडे आणि क्लिनर निधी वासनिक यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतले.
त्याच दरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे आणि संजय नंदन हे तिथे पोहोचले. पोलीस आल्याचे समजताच लुटारुंनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जंगलात पळ काढला. एका दरोडे खोराला महामार्ग पोलिसांनी पकडले होते. बाकी दोघांचा तपास सुरु आहे.