कोरोना अपडेट

मोठी बातमी : मुंबईतील ६१ डॉक्टरांना कोरोनाची लागण

Share Now

दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे, ही बाब चिंता वाढवणारी आहे, त्यात धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये ६१ निवासी डॉक्टर कोरोना बाधित झाले आहे. त्यात निवासी डॉक्टर संपावर असल्याने डॉक्टरांची संख्खा कमी असल्याने रुग्णसेवेवर याचा परिणाम होत असतो.

पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे समुपदेशन रखडल्याने २७ नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते.

डॉक्टरांची कमतरता असल्याने ओपीडी सुरळीत चालत नाही. गेल्या ४८ तासात १२० डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय अजून काही जणांना लागण होऊन ही संख्या वाढण्याची भीती आहे. याचा परिणाम रुग्णसेवेवर होणार आहे. यामुळेच मी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या संचालक मंडळाने दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं,” अशी मागणी डॉक्टर अविनाश दहिफळे यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *