आई आणि भावामुळे पोटच्या मुलाला सोडलं ; अनैतिक संबंधातून मुलाचा जन्म
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकल्याला आई व भावाच्या दबावामुळे प्रियकराकडे सोपविल्याची घटना नुकतीच वडगाव कोल्हाटीत समोर आली आहे . या मातेविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील लिंगेवाडी बस स्थानकावर २ मे रोजी एका इसमाला जिवंत अर्भक सापडले असून त्याने ते घरी नेल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास केला असता गणेश खेत्रे याच्याजवळ तीन ते चार दिवसांचे पुरुष जातीचे बाळ सापडले. विचारल्यावर गणेशने वेगळीच थाप पोलिसांना मारली.
हेही वाचा :- प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
काही तरी लपवत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बाळाला भोकरदन ग्रामीण रुग्णालयाकडे सोपवले गणेश आणि मित्र नीलेशची पोलिसांनी कसून चौकशी केली. मग गणेशने वडगाव कोल्हाटी येथील नीता (नाव बदलले आहे) हिचे ते . गणेश बाळ असल्याचे पोलिसांना सांगितले.
नीताला तिच्या पतीने सोडून दिले आहे. नीताशी आपले संबंध असून तिचा भाऊ अनिल (नाव बदलले आहे) याने हे बाळ आपल्यास दिल्याचे गणेशने पोलिसांना सांगीतले.
भोकरदन पोलिसांनी नीताची चौकशी केली. तिने आपले व गणेशचे लग्नाअगोदरपासून प्रेमसंबंध असक्याचे सांगितले. मात्र घरच्या मंडळीनी लग्न दुसन्यासोबत लावून दिल्याचे सांगितले. लग्नानंतर पतीपासून दोन अपत्ये झाली. पतीला दारूचे व्यसन जडल्याने आपण माहेरी राहत असल्याचे सांगितले. गणेशपासून ३० एप्रिल रोजी घाटीत बाळाला जन्म दिला होता.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देते 10 लाखांचे कर्ज, विना गॅरंटी, जाणून घ्या अर्ज कसा करावा