मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ; राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाईचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ त्यांचा मुलगा नावेद मुश्रीफ आणि जावई यांच्यासह नऊ आरोपींवर कंपनी कायद्या अंतर्गत कारवाई सुरू करा, असे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस.गोसावी यांनी दिले आहेत.
हसन मुश्रीफ यांनी शेल कंपनी स्थापन करून शेकडो कोटींचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात केंद्रीय तपास संस्थांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मुश्रीफ यांनी १५८ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याची कागदपत्रे त्यांनी ईडीला आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिली होती.
या संदर्भातली केस पुणे जिल्हा न्यायालयात पोहोचली आहे. या केसची दखल घेऊन पुणे जिल्हा न्यायाधीश गोसावी यांनी एकूण ९ आरोपींविरुद्ध कंपनी कायदा कलम ४४७ आधारे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
त्याचप्रमाणे याच्या या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मे रोजी घेण्याचे देखील निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत.