मोदींनी दिला नव्या वर्षात नव्या स्वप्नांचा मंत्र!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या शुभेच्छा दिल्या असून यामध्ये ते म्हणतात “ हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो. ” तसेच, “आपण प्रगती आणि समृद्धीची नवीन उंची गाठत राहू आणि आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करूया,” असे पंतप्रधानांनी आपल्या वर्ष २०२२ च्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नरेंद्र मोदींनी त्यांच्या “मन की बात” कार्यक्रमातील एका भागाची क्लिप देखील सोबत शेअर केली आहे. देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी “मोठा विचार करा, मोठी स्वप्ने पाहा आणि स्वतःला समर्पित करा आणि २०२२ हे वर्ष नवीन भारत घडवण्यामध्ये सोनेरी पान बनवा” असे नागरिकांना आवाहन केलेले आहे.