मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी
नगरसेवक तसेच पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्या आली आहे. राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील वक्तव्यामुळे राजकीय अडचणी येत असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली होती. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी स्थानीय स्थरावर राजकीय काम करण्यास राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत असे सांगितले.
यावरून त्याच्या राजकीय कारर्कीतील अडचल होईल का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तसेच त्यांना त्याच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून देखील काढण्यात आले, तसेच मनसेने नवीन शहराध्यक्ष पदी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती केली आहे.
मनसेच्या वतीने आलेल्या नियुक्ती पत्रात असे लिहले आहे कि, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा’, असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे.
वसंत मोरेंच्या नाराजीवर युवा कॉग्रेने देखील उडी घेतली होती, मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली भावना स्पष्टपणे व्यक्त करुन लोकशाहीला साजेसं काम केलं असल्याचे काँग्रेसचे युवा नेते आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटलं होते.