Uncategorizedमहाराष्ट्र

मोठ्या ‘टेक’ कंपन्यांच्या जाळ्यात अडकलंय जग

Share Now

आजच्या बिग टेक कंपनीज म्हणजेच गूगल, ॲपल, ॲमेझॉन आणि फेसबुक जे आजकाल आपला फोन आणि आयुष्यही व्यापून टाकत आहेत.. या पाश्चात्य कंपन्यानी आज अवघ्या जगभरात आपलं जाळं अंथरलं आहे. केवळ अमेरिकेत आज ॲमेझॉन इ-कॉमर्स सेल ५०% पेक्षा अधिक आहे, ९९% लोकांचा फोन हे ios आणि अँड्रॉइड सिस्टिम द्वारे चालतात. एकूण सर्वव्यापी या कंपन्या म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत.
सर्च इंजिन बद्दल सांगाव तर ८९% लोक गूगल वापरतात आणि ७४% लोक फेसबुक वापरतात. एका रिपोर्ट नुसार २०१८ मध्ये ॲप्पल ही तब्ब्ल $265,595 चा टर्नओव्हर करणारी कंपनी ठरली. याच्या वरून एक स्पष्ट अंदाज येतो की या कंपनीचा नेटवर्क बेस किती मोठा आहे.

मोठ्या टेक कंपन्या आता आपल्या स्पर्धकांवर कब्जा करताना किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. फेसबुक ने व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्राम ला स्पर्धा बघून ताब्यात घेतलं. एका रिपोर्ट मध्ये एकाधिकारणाचा प्रश्न विचारल्यावर फेसबुक कडून स्पष्टीकरण देण्यात आलं की फेसबुक चे आजपण स्नॅप चॅट, ट्विटर हे स्पर्धक आहेत. एखादी कंपनी किती पॉवरफुल असावी कि ती एकाधिकार निर्माण करेल?
हे सगळ्यांना माहिती आहे कीं या कंपन्या आपल्याला केवळ कन्टेन्ट किंवा सर्विस देत नाही तर आपला डेटा घेऊन आपण कोणती जाहिरात बघावी, सोशल मीडियावर कोणती सामाजिक किंवा राजकीय पोस्ट बघितली पाहिजे हे या कंपनीच्या अल्गोरिथमद्वारे ठरवण्यात येते. कंपनी हि एखाद्या प्रॉडक्ट आणि उपभोक्त्यामधील दुआ आहे. जसं आपण एखादे प्रॉडक्ट सर्च करतो तेव्हा त्याचा डेटा घेऊन त्याच प्रॉडक्ट ची जाहिरात ही आपल्याला अनेक सोशल साईट्स वर दिसायला सुरुवात होते.. या भडिमारामुळे भुरळ पडून आपण ते उत्पादन विकत घेतो. केवळ जाहिरातच नाही तर कोणत्या राजकीय पक्षाची पोस्ट आपण वाचावी हे सुद्धा या कंपनीजच्या अल्गोरिथम द्वारे ठरवण्यात येत.
टेकनॉलॉजि सेक्टर हा जगातील सगळ्यात मोठा लॉबिंगसेक्टर आहे. लॉबिंग म्हणजे अशे प्रायव्हेट कंपनी जे सरकारच्या निर्णयाला बदलण्याची क्षमता ठेवतात. या सर्व डेटा वरून हे नक्की लक्षात येतं कि या बिग टेक कंपनीज चा प्रभाव हा प्रत्येक लहान ते मोठ्या घटकांपर्यत्न येणाऱ्या वेळेत होईल. याची सुरुवात कधीच झाली आहे. गुगल वर तुम्ही काहीही सर्च करा, नंतर सोशल साईट्सवर याच अनुषंगाने आपल्याला जाहिराती दिसू लागतात किंवा त्याच प्रकारच्या पोस्ट्स दिवसायला सुरुवात होते. या प्रभावी -आक्रमक पद्धतीने तुम्ही टाळू म्हटले तरी टाळता न येणारी जाहिरात मालिका सुरूच राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *