आमदार रवी राणा आणि खा. नवनीत राणा मुंबईत दाखल ; मातोश्री बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आज मुंबई दाखल झाले आहेत, दोघांचाही शिवसैनिकांकडून शोध सुरू आहे, कारण मातोश्रीवर रवी राणा यांना येऊ देणार नाही असा निर्धार शिवसैनिकांनी केला होता.
अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशीच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिलं होतं काल त्यांनी 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज पहाटे मुंबई आल्याची माहिती समोर आली असून सोबत युवा स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते देखील मुंबईत दाखल झाले आहे. यांना रोखण्यासाठी शिवसैनिक बडनेरा रेल्वे स्टेशनवर हजर होते.
हेही वाचा :- राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ
नंदगिरी गेस्ट हाऊस बाहेर शिवसैनिकांची गर्दी
नंदगिरी गेस्ट हाऊस बाहेर शिवसैनिकांची गर्दी केली आहे. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आज आणि उद्याचं नंदगिरी गेस्ट हाउस मध्ये बुकिंग केले आहे मात्र दोघेही गेस्ट हाऊसवर पोहोचली नाहीत.
हेही वाचा :- फोन टॅपिंग प्रकरण ; संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे ‘या’ बोगस नावाने फोन टॅपिंग
आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे पुन्हा एका सांगितले आहे. गेल्या आठवड्यात राणा यांनी ठाकरे यांना हनुमान जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करण्यास सांगितले होते, ज्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली होती आणि राज्यात जातीय तेढ भडकवल्याचा आरोप केला होता.
शनिवार २३ एप्रिल रोजी मुंबईला जाणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील. विदर्भातील बडनेरा येथील आमदाराने पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसाचे पठण करावे, अन्यथा ते त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करतील.
२३ एप्रिल रोजी रवी राणा “मातोश्री” समोर हनुमान चालीसा पठण करणार
हे ही वाचा (Read This) या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये