राज्यमंत्री बच्चु कडु यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावास!

अमरावती : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील आणखी एक मंत्री अडचणीत सापडले आहेत. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडु यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील फ्लेटची माहिती लपविल्याप्रकरणी बच्चू कडु यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी भाजपाचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यावर न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणाचा आज निकाला आला आहे. चांदूरबाजार येथील प्रथमवर्ग न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *