“मेहकर दंगल: 23 जणांना अटक, संचारबंदी लागू; काय आहे या हिंसक घटनेचं कारण?
“मेहकर दंगल: 23 जणांना अटक, संचारबंदी लागू; काय आहे या हिंसक घटनेचं कारण?
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात २४ नोव्हेंबर रोजी रात्री दोन समुदायांमध्ये हिंसक दंगल झाली. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात विजयी झाले होते. यानंतर काही गटांकडून वाहने पेटवून दिली आणि मारहाणीच्या घटना घडल्या. दोन्ही गटांकडून दगडफेक केली गेली, ज्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर केला.
मुख्यमंत्रिपदावर फडणवीस? मनोज जरांगें यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत
पोलिसांनी त्वरित कारवाई करत या दंगलीप्रकरणी 23 आरोपींना अटक केली आहे. तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेहकरमधील माळीपेठ आणि इतर काही भागांमध्ये संचारबंदी लागू केली गेली आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाने आक्रमक होऊन बंदोबस्त वाढवला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी सूचना केली आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
तणावामुळे मेहकर शहरात सध्या शांतता आहे, पण बाजारपेठ बंद आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलम 144 लागू केले आहे. पोलिसांनी शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू केल्या आहेत.