भारतीय नौदलात मेगा भरती ; असा कराल अर्ज

भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी आहे. इंडियन नेव्हीकडून ट्रेड्समनच्या पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या भरतीअंतर्गत १५३१ पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

एकूण पदांची संख्या

अनारक्षित श्रेणी : 697 पदं
EWS श्रेणी : 141 पदं
OBC प्रवर्ग : 385 पदं
SC श्रेणी : 215 पदं
ST श्रेणी : 93 पदं

वेतन

या भरतीअंतर्गत २२ मार्चपासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.

यात ट्रेडसमनच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल २ अंतर्गत १९,९०० ते ६३,२९९ रुपये प्रति महिना वेतन दिलं जाणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा

भारतीय नौदलातील व्यापारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २५ वर्षांच्या आत असावं आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

भारतीय नौसेनेत भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण झालेला असावा.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *