शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट राजकीय चर्चांना उधाण
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दिल्ली येथे भेट झाली असून जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे दोन बड्या नेत्यांनी मध्ये चर्चा झाली परंतु भेट कुठल्या कारणाने झाली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महा विकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणाकडून चौकशी सुरू आहे. यावर देखील चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.
काल शिवसेना खा. संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केली त्यात मुंबई पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत आहेत. यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.