सात महिन्यापूर्वी केलं लग्न, नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या
पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे नवविवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घटना ८ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी पूर्ण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यची नोंद करण्यात आली आहे.
गंगाधर विश्वास चापके वय (२५) आणि सपना गंगाधर चापके वय (२१) असे नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. ८ जानेवारी रोजी दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, असून 9 जानेवारी रोजी ही घटना समोर आली आहे. यासंदर्भात पूर्णा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश भाले कर्मचारी घाटे यांनी घडलेल्या घटनास्थळी पंचनामा केला आहे.
मात्र त्यांच्या आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही, गंगाधर आणि सपना चापके याच्या विवाहाला वर्ष देखील पूर्ण झालेलं नव्हतं, लग्नानंतर काही महिन्यातच त्यांनी आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे.
अजूनही आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत