विद्यार्थ्याने शिक्षणासाठी केली चोरी; घटनेतून समाजाला विचार करण्याची गरज
विद्यार्थ्याने शिक्षणासाठी केली चोरी; घटनेतून समाजाला विचार करण्याची गरज
पनवेलमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी मोबाईल शॉपमधून चोरी केली. युवकाने एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि तेथून ५४ मोबाईल चोरून नेले. या चोरीचा प्रकार सकाळी दुकान उघडल्यानंतर उघडकीस आला. नंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीने आरोपीला अटक केली.
दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात मोठा बदल विद्यार्थ्यांना दिला “धक्का” !
तपासाअंती आरोपीने पोलिसांना कबूल केले की, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असलेल्या या युवकाला महाविद्यालयाची फी भरण्याची अडचण होती. त्याने या अडचणीवर मात करण्यासाठी मोबाईल चोरण्याचा मार्ग निवडला होता. चोरी केलेले मोबाईल विकून तो फीची रक्कम जमा करण्याचा विचार करत होता. पोलिसांनी आरोपीकडून ४१ मोबाईल जप्त केले आहेत, आणि अधिक तपास सुरू केला आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
या प्रकाराने नवी मुंबईत धक्का दिला आहे. युवकाने चोरी करण्याचे कारण सांगितल्यावर त्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मोबाईल शॉपमध्ये चोरी केल्याच्या या घटनेची निंदा होत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत, आणि संबंधित युवकाच्या भविष्यासाठी योग्य कारवाई केली जाईल.