मराठवाड्यातील देवस्थान उजळणार!
मराठवाड्यातील देवस्थान उजळणार
मराठवाड्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारतातील बारा जोतिर्लिंगापैकी पाच मंदिर हे महाराष्ट्रात आहेत.त्यातील तीन जोतिर्लिंग हे मराठवाड्याच्या भूमीला लाभले आहे. वेरूळ,औंढा नागनाथ, परळी वैजिनाथ हे तीन जोतिर्लिंग आहेत. या ठिकाणी संपूर्ण भारतातून यात्री दर्शनासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून या ऐतिहासिक वास्तूचा दर्जा वाढविण्याचा मानस सरकारने दाखवला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे घृष्णेश्वर मंदिर आहे, या ठिकाणी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनली आहे आणि हे बांधकाम, 44.400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे.
औंढा नागनाथ हे देवस्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत असून या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की , चारही दिशेने दरवाजे आहेत. नरसी नामदेव हे देखील हिंगोली जिल्ह्यातील आहे हे ठिकाण संत नामदेव महाराज याचे जन्मगाव आहे, हिंगोली पासून 17 किलोमीटर अंतरावर आहे,महाराष्ट्र सरकारने नरसीला पवित्र स्थान म्हणून घोषित केले आहे, याचा धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नरसीला विकसित करीत आहे.
या ठिकाणी आज देखल मूलभूत सुधारनाची गरम आहे. त्यामुळे पर्यटन निवास, आयोजित सहली आणि मार्गदर्शन, त्या पर्यटन संस्थाना प्रसिद्ध देने, त्या भागातील हॉटेल उद्योगास अर्थसहाय्य करणे, ठिकाणीचे माहिती केंद्र चालवणे. यावर शासन भर देणार असून पुढील काळात मराठवाड्यातील देव उजळवणार आहेत.