शिवजयंतीनिमित्त क्रांतीचौकात लावलेले बॅनर मनपाने रातोरात काढले ; मनसे आक्रमक
औरंगाबाद : शिवजयंती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना मनपाने मध्यरात्री अचानक क्रांतीचौकातील शिवजयंतीनिमित्त शुभेछांचे लावलेले बॅनर काढल्याने शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
याची माहिती मनसेला मिळताच जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकरांनी त्या ठिकाणी जाऊन जाब विचारला असता एकही मनपा अधिकारी फोन उचलत नव्हते. उलट शिवप्रेमीनची गर्दी वाढत असल्याचे दिसताच मनपा अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. तसेच याप्रकरणाची भणक लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यस्थी केल्याने वातावरण निवळल्याचे बघायला मिळाले.
दरम्यान, एव्हढ़या संवेदनशील मुद्द्यावर मनपा प्रशासन रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने अशी कारवाई का करते आहे? याचे उत्तर मात्र मनपाने दिले नसल्यामुळे हा वाद आता चिघळण्याची चिन्हे दिसता आहे.