जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांसह एका व्यक्तीला अटक, चलनातून बाद झालेल्या नोटांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटचा शोध सुरू
आरोपींकडून 62 लाख रुपयांचे जुने चलन सापडले. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने 14 लाख रुपयांच्या नवीन चलनाच्या बदल्यात 62 लाख रुपयांच्या जुन्या नोटा खरेदी केल्या आहेत.
दिल्ली पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात असलेल्या रमेश पार्कमधून डॉ. एजाज अहमद नावाच्या व्यक्तीला नोटाबंदीच्या काळात बंद करण्यात आलेल्या ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांसह अटक केली आहे. आरोपींकडून 62 लाख रुपयांचे जुने चलन सापडले. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने 14 लाख रुपयांच्या नवीन चलनाच्या बदल्यात 62 लाख रुपयांच्या जुन्या नोटा खरेदी केल्या आहेत.
पावसाच्या विलंबानंतर खरीप पिकांच्या पेरण्याना वेग,आतापर्यंत सुमारे २.२५ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण !
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या पथकाने आयकर विभाग, केंद्रीय गुप्तचर संस्था आयबी आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
अटकेनंतर आयटी, आयबी आणि स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी आरोपी अहमदची चौकशी केली. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य पाहता गुरुवारी पुन्हा सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला धावून आले ‘एकनाथ’
जुन्या नोटा जमा करण्यामागील कारण काय?
एक ऐतिहासिक निर्णय घेत भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली. नोटाबंदीच्या काळात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्या जुन्या नोटांच्या जागी काही नव्या नोटा लागू करण्याचे आदेश देण्यात आले.
आतापर्यंत पोलिसांच्या चौकशीत या व्यक्तीने अनेक ठिकाणांहून या जुन्या नोटा जमा केल्याचे सांगितले. या नोटा त्याने सुमारे 20 लाख रुपयांना विकल्या असत्या. पोलीस आरोपीचे म्हणणे गांभीर्याने घेत असून जुन्या नोटा जमा करण्याचे कारण शोधत आहेत. यासोबतच या जुन्या नोटा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरू आहे.