“माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही” – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच गोत्यात आले आहेत. आधीच ओबीसी आरक्षणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात जितेंद्र आव्हाड यांनी केल्याला वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
जितेंद्र आव्हाड बोलले कि, “माझा ओबीसी समाजावर विश्वास नाही, जेव्हा मंडळ आयोग स्थापन झालं तेव्हा आयोगाचं आरक्षण फक्त ओबीसीसाठी होत. परंतु जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात नव्हतेच कारण ओबीसीना लढायचं नसतंच, ओबीसींवर ब्राम्हण्या वादाचाच पगडा आहे, आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना माहिती नाही चार पिढ्यापूर्वी आपल्या बापाला, आजोबा, पंजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नव्हते. पण आता आरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पुढे येत आहेत.”
असे जितेंद्र आव्हाड बोलले याच्या या वक्तव्यावरून भाजपने निषेध व्यक्त करून ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का असा प्रश्न उपस्तित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध!
'माझा OBC समाजावर वर फार विश्वास नाही' – @Awhadspeaks#OBC समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा @NCPspeaks घेणार का?
NCP च्या मनात OBC समाजाबद्दल एवढा राग का? यासाठीच OBC चे राजकीय आरक्षण घालवलं का? pic.twitter.com/9ySJ0dnl85
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 3, 2022