AIMIM एमआयएम सोबत युती करणार ? संजय राऊत
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला . आणि राजकीय चर्चाना उधाण आले आहे . यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देऊन युतीचा प्रस्ताव नाकारला आहे.
एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम आहे. त्यांची छुपी युती आहे, असं संजय राऊत यांनी म्हणाले. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. राज्यात हेच समीकरण राहणार आहे. यामध्ये बाकी कोणीही काही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे आम्ही पक्ष आहोत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुढगे टेकतात. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. एमआयएम आणि भाजपची युती असल्याचं सर्वांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पाहिलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती यात खा. जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला होता. तुमचं तीन चाकांचं सरकार आहे. त्याला एक चाक जोडून चारचाकी करून घ्याव. आम्हाला सोबत घ्या, अशी ऑफर जलील यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. माझा निरोप वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, असं त्यांनी राजेश टोपेंना सांगितलं.