महाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट ! काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का ? नाना पटोले यांनी दिला थेट इशारा

Share Now

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकार पासून वेगळं होऊन निवडणूक लढविण्याबाबत एकदाही भाष्य केले नाही . आघाडीत काँग्रेसवर अन्याय झाल्याचा मुद्दा त्यांनी उचलण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले यांच्या मनस्तापात भर पडली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भारतीय जनता पक्षाशी संगनमत असल्याचा आरोप केला आहे . आजही त्यांनी राष्ट्रवादीवर भाजपला मदत केल्याचा आरोप केला. यासोबतच त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीत राहण्याच्या शक्यतांबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचे आणि काँग्रेसला कमकुवत करण्याचे राजकारण करत आहे. ज्या मुद्द्यांवर अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाले, त्या मुद्द्यांवर पायमल्ली होत आहे. आमच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा सातत्याने अपमान केला जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे तक्रार केली आहे. याबाबत आमचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. हे येत्या काही दिवसात कळेल.

विकासात राजकारण करू नका, विकासासाठी सर्व समाज बांधवानी एकत्र येण्याची गरज : आ. संजय शिरसाट

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर ?
काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. महाविकास आघाडीत फूट पडणार का ? त्याला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, ‘आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये आलो नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये आलोय . राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये हाच फरक आहे. त्याचा परिणाम येत्या काळात दिसेल.

ही वाचा (Read This) उन्हाळ्यात ताजेतवाने करणारे पेय: बनवा लिंबू आणि पुदिन्याचे हे थंड पेय, कसे बनवायचे ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *