महाविकास आघाडीकडून आज बंद ची हाक..!
औरंगाबाद :- लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घातली त्या दुर्घटनेत एकूण आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले, घटना घडून आठ दिवस उलटून गेले तरी कुठलीही कारवाई झाली नव्हती यामुळे वातावरण आणखी चिघळले होते. प्रियांका गांधी, राहुल गांधी व इतर नेत्यांना देखील घटनास्थळी मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांन भेटायला जाण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवणूक केली होती.
उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यावर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या बंदला भाजपचा विरोध असून इतर संघटनांनी या महाराष्ट्र बंद ला पाठिंबा दिला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालय आणि मेडिकल चालू राहील.
परंतु राज्यात बंदला व्यापारी आणि शेतकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही शहरातील व्यापारी वर्गाने बंदला पाठिंबा दिला तर काही शहरात नियमितपणे दुकाने चालू आहेत.
औरंगाबाद येथील कृषि उत्पन्न बाजार समिती मधील भाजी मंडी व इतर व्यापारी वर्गाची दुकाने नेहमी प्रमाणे चालु आहेत. व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा न दिल्याने हा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागातुन आज या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.