महाराष्ट्रात वेगात सुरु झाले लसीकरण औरंबागादेत पहिली लस घेणारे ६५ टक्के
गेल्या 2 वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातलेलं आहे. २० मार्च २०१९ पासून कोरोना महामारी मुळे सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना सर्वत्र अनलॉक करण्यात आले होते. आता कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात लसीकरण अनिवार्य आहे. आता केंद्र सरकारने १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यभर सुरु असलेल्या लसीकरणाने मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ७ कोटी पेक्षा पुढे पोहोचली आहे. ही कामगिरी करणारे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ७ कोटी १ लाख १८ हजार झाली असल्याची माहिती दिली. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३ कोटी ४६ लाखावर पोहोचली असल्याचं सांगितलं होतं. सर्वात जास्त लसीकरण मुंबई ला झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३२ लाख २४ हजारावर लोकसंख्या आहे २२ नोव्हेंबर पर्यंत ६४. ३६ टक्के लोकांना पहिला तर २७.७८ टक्के लोकांना दुसरा डोस दिला गेला आहे
गेल्या काही दिवसांपासून 11 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना होण्याचे प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. म्हणूनच त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी केंद्राकडे राज्य सरकार मागणी करत आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्याचबरोबर 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय.