अयोध्येत महाराष्ट्र सदन, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौर्यावर आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक अयोध्येत गेले आहे. संजय राऊत देखील या दौऱ्यात आदित्य ठाकरें सोबत आहे. तसेच अनेक शिवसेनेचे मोठे नेते देखील या दौऱ्यात आदित्य ठाकरेच्या सोबत आहे. तसेच अयोध्येत माध्यमांशी बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. अयोध्यात महाराष्ट्र सदन होणार त्यासाठी मुखयमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुखयमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोबत पात्र व्यवहार देखील करतील, अयोध्या ही खूप पावनभूमी मानली जाते. अयोध्या ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची जन्मभूमी मानली जाते. या जन्मभूमीत रामलल्लांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. यामध्ये महाराष्ट्रातील भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील भाविकांची अयोध्येत योग्य सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बातचित करुन महाराष्ट्र सरकार अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली.

सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी निराश, शेवटच्या टप्प्यात आता करायच काय ?

दरम्यान, शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांचं लखनऊ विमानतळावर आगमन झालं. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आदित्य ठाकरे दुपारी अयोध्येला पोहोचले. अयोध्येत गेल्यावर त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट देऊन महाप्रसादाचा अस्वाद घेतला. त्यानंतर ते पंचशील हॉटेलात गेले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राम मंदिरापासून ते महापालिका निवडणुकीपर्यंतच्या सर्व मुद्द्यावर त्यांनी उत्तरे दिली.

दोन लग्न करून ‘तो’ फरार, आता पोलिसांनी केले ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित

प्रत्येकवेळी त्यांनी राजकीय प्रश्नांना उत्तरे देण्याचं टाळलं. त्याऐवजी त्यांनी अयोध्ये दौऱ्याशी संबंधित प्रश्नांना उत्तर देणं अधिक पसंत केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमची हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *