महाराष्ट्र “लॉकडाऊन” च्या दिशेने,आजपासून निर्बंध कडक करण्याचा निर्णय
राज्यात आजपासून निर्बंध कडक करण्यात येणार, काल झालेल्या बैठकीत टास्क फोर्सने राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबाबत चिंता व्यक्त केली. काल राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा पाच हजारावर गेला. याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पोलीस प्रशासन आणि टास्क फोर्सची बैठक झाली त्यात कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम , राजकीय सभा मेळावे अश्या कार्यक्रमात नागरिकांची गर्दी मोठ्या प्रामाण्य होत असते, गर्दी टाळण्यात यावी यासाठी शासनाने नवे निर्बंध जारी केले आहेत.
– लग्न समारंभ , धार्मिक कार्यक्रम, राजकीय मेळावे यासाठी ५० लोकांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे.
– अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
– राज्यातील पर्यटन स्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
– कोरोना रुग्णाची वाढती रुग्ण संख्या बघता, स्थानिक प्रशासनाला निर्बंध लावण्याची सवलत देण्यात आली आहे.