महाकुंभ:- IIT बाबा नेमके कोण आहेत ? पहा रहस्यमय इतिहास !
प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे दर १२ वर्षांनी आयोजित होणारा महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. या भव्य मेळाव्यात देश-विदेशातून करोडो भाविक सहभागी होतात. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या यंदाच्या महाकुंभमेळ्यातही विविध देशांतील भाविकांनी हजेरी लावली आहे. या भाविकांमध्ये एक नाव विशेष आकर्षणाचा विषय ठरले आहे – अभय सिंग, आयआयटी मुंबईचे माजी एरोस्पेस अभियंता.
अभय सिंग यांनी वैज्ञानिक कारकीर्द सोडून अध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते मसानी गोरख या नावाने ओळखले जातात. त्यांच्या प्रवासाबाबत बोलताना ते म्हणाले, “हा माझ्या जीवनातील सर्वोत्तम टप्पा आहे.” अंतर्मनाच्या शोधाने त्यांना वैज्ञानिक क्षेत्रातून दूर नेले आणि भिक्षूचे जीवन स्वीकारण्यास प्रवृत्त केले.
महाकुंभमेळ्यातील त्यांच्या उपस्थितीने, तसेच अस्खलित इंग्रजी संवाद कौशल्याने अनेकांची उत्सुकता वाढवली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारे मसानी गोरख यांचे ३६,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांचे इंस्टाग्राम पोस्ट प्रामुख्याने ध्यान, योग आणि अध्यात्म यांवर आधारित असतात.
महाकुंभमेळ्याच्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, “येथे मला मनःशांतीचा अनुभव मिळाला आहे.” आयुष्याच्या एका वेगळ्या प्रवासाला वाहून घेतलेल्या अभय सिंग यांच्या या बदलाने, महाकुंभातील त्यांच्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.
सोशल मिडीयावर सध्या महाकुंभचा जल्लोष सुरू आहे. त्या निमित्ताने महाकुंभ मधे सामिल होणाऱ्या नागासाधू, अर्धनागासाधू व इतर साधूंकडे तरूणाई आकर्षित होताना पहायला मिळत आहे.
▪️अशातच एक बाबा जे की आयआयटीचं शिक्षण पुर्ण करुन नंतर साधू होण्याकडे वळले, त्यांची चर्चा प्रचारमाध्यात चांगलीच रंगलेली पहायला मिळते आहे.
▪️हे आयआयटीयन इंग्रजी त्यांच मुळ नाव अभय सिंग असं आहे. ते सोशल मीडियावर चांगले ॲक्टीव्ह असतात. त्यांना विज्ञान व आध्यात्म या दोन्हींचा संगम चांगला ठाऊक आहे.
▪️मुंबई येथून आय आय टी करत असताना बाबा अभय सिंग यांना प्लेटो व सॉक्रेटिस च्या तत्वज्ञानात रस निर्माण झाला त्याचा अभ्यास करत पुढे गेल्यावर त्यांनी जिवणाविषयी सखोल माहिती घेण्याचा निश्चय केला.
▪️डिग्री पुर्ण करुन नंतर फोटोग्राफी, निसर्गातील भटकंती करत त्यांनी हळुहळु आध्यात्याकडे पुर्णत: वळण घेतले. आणि ते एका साधूचे जिवण जगू लागले.