एम.आय.टी. पॉलिटेक्निक रोटेगाव येथील विज्ञान प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद
एम.आय.टी. पॉलिटेक्निक रोटेगाव या संस्थेमध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद देत वैजापूर परिसरातील शाळांमधून 53 विद्यार्थी संघानी सहभाग नोंदविला आणि आपल्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील गुणांना प्रदर्शित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचे सिद्ध करून दाखविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्राचार्य प्रा.किशोर पाटील यांनी संस्थेविषयीची माहिती देताना एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाची आवश्यकता असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे सांगितले. याप्रसंगी प्राचार्य श्री.नारायण कदम, प्राचार्य श्री.एस.एम.त्रिभुवन, प्रिन्सिपल श्रीमती स्वाती खैरनार, प्राचार्य श्री.बी.एम.हजारे व शिक्षक श्री.राजेंद्र आव्हाळे, श्री.एम.ए.हिवाळे, श्री.विलास पगार, प्रा.पी.डी.भाटकर, श्री.बी.ई.व्यवहारे, श्री.साळुंखे या मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ह्या मानवाच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत, असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनात अवश्य सहभाग नोंदवावा, ज्यामुळे त्यांच्यात संवाद कौशल्य, सादरीकरण व सहकार्याची भावना हे गुण विकसित होतील, असेही सांगितले.
या स्पर्थेत जिल्हा परिषद शाळा, लासुरगाव या शाळेतील विद्यार्थी रोहित शेजुळ, राहुल आगवन, विशाल सैलाने, दत्तात्रय शेजुळ या संघाने प्रथम क्रमांकासह रु.10,000/- पारितोषिक मिळविले. साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालय, काटेपिंपळगाव या शाळेतील विद्यार्थी सुदर्शन धोत्रे, सागर भिंबाळे, ओंकार राऊत, वैभव राऊत या संघाने द्वितीय क्रमांकसह रु. 7,000/- पारितोषिक मिळविले. तर संत तुकाराम विद्यालय, शिंगी या शाळेतील विद्यार्थी गौरव पवार व संदीप पवार या संघाने तृतीय क्रमांकासह रु.5,000/- पारितोषिक मिळविले. न्यू हायस्कूल, वैजापूर (वैभव मतसागर, साई मतसागर, आदित्य मतसागर), न्यू हायस्कूल, दहेगाव (रेणुका मगर, वैष्णवी रावते, आंचल बोराडे, गायत्री दागोडे) आणि जिल्हा परिषद शाळा, मांजरी (शाहेद शेख व गणेश लोहकरे) या शाळांमधील विद्यार्थी संघांनी उत्तेजनार्थ बक्षिसांसह प्रत्येकी रु.2,000/- पारितोषिके मिळविले. याप्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शाळांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री.नारायण कदम, श्री.विलास पगार, प्रा.पी.डी.भाटकर व प्रा.एस.एन.पाठक यांनी परीक्षक म्हणून यशस्वीरीत्या कार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.विवेक जोशी यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक प्रा.योगेश धोत्रे, प्रा.अमोल निकम, प्रा.विवेक जोशी तसेच प्रा.दिगंबर आव्हाळे, प्रा.गणेश भिसे, प्रा.विलास जाधव, प्रा.सूर्यकांत जगताप व श्री.संदीप चव्हाण, श्री.प्रदीप आव्हाळे, श्री.योगेश कलात्रे यांनी विशेष परिषद घेतले.