महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावरून पेटलं; अब्दुल सत्तार यांनी केली खा. जलील यांना आवाहन
औरंगाबाद : शहरातील तरुणाईच्या पसंतीचे ठिकाण म्हणजे कॅनॉट, या ठिकाणी एक महाराणा प्रताप उद्यान देखील आहे. तेथे महाराणा प्रतापांचा एक अर्थकृत पुतळा आहे. त्याला पूर्ण आणि भव्य करण्यासाठी एक कोटीचे निधी आले आहे, यावर खासदार जलील यांनी या ठिकाणी पुतळा बसवण्यास विरोध करत, महाराणा प्रताप यांच्या नावावर सैनिकी शाळा उभारावी असे मुख्यमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकारी यांना पात्र लिहिले होते.
त्यावर भाजप आणि शिवसेनेने जलील यांच्यावर निशाणा साधला, ज्यांना महाराणा प्रतापांचा इतिहास माहित नाही त्यांनी यावर काही बोलू नाही असे आमदार अंबादास म्हणले होते. मात्र आता महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी जलील यांना आवाहन केले आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी औरंगाबादमधील महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीच्या वादासंबंधी ते बोलले. अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसणारच. तसेच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे. औरंगाबादेत हा पुतळा बसवताना मी स्वतः पुढे असेन.’