मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आणि बाळा नांदगावकर याना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र पत्र कुणी लिहलं या संदर्भात काही माहिती नाही. असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
बाळा नांदगावकर म्हणाले कि, माझं ठीक आहे परंतु राज साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे याबाबत माहिती दिली आहे. यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यानी दिले आहे.
राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली, तसेच भोंग्यबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या मिळत आहेत. तसेच या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेतली असून गृहमंत्री याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बोलले असल्याचे नांदगावकरांनी सांगितले.
सरकारी नौकरी 2022: भारतीय कृषी संशोधन संस्थेत सहाय्यक पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज