ओबीसी आरक्षणासाठी एकत्र लढा देऊ.. आणि मंत्री छगन भुजबळ यांनी “ओबीसी बचाव” टोपी घातली …

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे, काल नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा यासाठी विरोधक आक्रमक बघायला मिळाले तर सत्ताधारी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अभिभाषण न करता निघून गेल्याने घोषणाबाजी करत होते या सगळ्या गोंधळात अधिवेशन दिवसभर स्थगित राहिले. आज मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा रंगली आहे.

ओबीसी आरक्षणावर तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे. तो ‘बुडवा’ होईल, असं काही करू नका, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळात आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या सुनावणीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला जोरदार धक्का बसला आहे. त्यावरूनच आज विधिमंडळात चर्चेच्या फैरी झडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा, असे आवाहन केले. हाच मुद्दा धरत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली.

काही नगरपालिका ओव्हरड्यू झाल्यात. मात्र, एकही झेडपी ओव्हरड्यू झाली नाही. फडणवीसांची तुम्ही दोघं तिघं आणि आमच्याकडे एक-दोन लोकं मिळून यावर काम करुयात. काही गोष्टी राहून गेल्या. त्या मी मान्यही केल्या. टेक्निकल गोष्ट राहून गेल्या. तारीख वगैरे. मी मान्य करतो. सुप्रीम कोर्टाचा आदर करतो. आम्ही सभागृहात एकमेकांवर चिखलफेक करणार नाही, उणीदुणी करणार नाही. आपण ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत, हे देशाला दाखवून देऊ.

फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टात काय झालं, त्यावर आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो. ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे. म्हणून भाजपच्या एका भगिनीनं ओबीसी वाचवा टोपी घालून दिली, मी ती लगेचच घातली. खासदार विल्सन तामिळनाडूचे. त्यांच्या संदर्भातला उल्लेख कोर्टानं केला. त्यांनी सांगितलं की, अशा अमेंडमेन्ड ज्या पार्लमेंटमध्ये झालेल्या आहेत. राजकीयदृष्ट्या आरक्षण देण्याचा निर्णय मान्य केलाय. ओबीसींना आरक्षण द्यावं, असे कबूल केलंय. मात्र, या डाटाची स्क्रुटनी आम्ही नाही करु शकत, असं कोर्टानं म्हटल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *