९२ व्या वर्षी लता मंगेशकर यांनी घेतला अखेरचा श्वास
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं असे. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक – गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळख होती .
लता मंगेशकर यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
लता मंगेशकर याना काही दिवसांपूर्वी कोरोनासोबतच न्युमोनिया देखील झाला होता. यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.