महाराष्ट्र

कापसाची मोठी आवक, दर खाली, शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट!

राज्यात कापसाचं उत्पादन आणि शेतकऱ्यांचे हाल: खासगी बाजारात कमी दर, केंद्राच्या हमीभावाशी फरक राज्यात अनेक ठिकाणी कापसाचं मोठं उत्पादन होतं आणि कापूस शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा फायदेशीर ठरला आहे. यामुळेच कापसाला “पांढरे सोने” असं संबोधलं जातं. दिवाळीच्या सुमारास कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली असून, कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्रामीण भागात धावपळ सुरू आहे. केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ७ हजार रुपये निश्चित केला असला तरी, खासगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. व्यापारी ६८०० ते ७ हजार रुपये दर देत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत कापूस विकावा लागतोय.

महिला उमेदवाराला बकरी म्हटल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या भावावर गुन्हा दाखल

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले, देशातील बाजारात वाढीची शक्यता
तरी देखील, आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्यात कापसाचा दर ७२.३४ सेंट प्रति पौंड होता, आणि तो आता ७२.६९ सेंट प्रति पौंडपर्यंत पोहोचला आहे. यामुळे देशातील बाजारातही कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे की, पुढील काळात कापसाचे दर सुधारतील.

नैसर्गिक आपत्तीमुळे कापसाचं उत्पादन आणि दरावर परिणाम
यंदा कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पादनावर मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळावा अशी अपेक्षा होती. दसऱ्यापासून बागायती कापूस बाजारात दाखल झाला, परंतु परतीच्या पावसामुळे कापसाचं आणखी नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस साठवण्याऐवजी बाजारात विक्रीसाठी आणावा लागतोय. त्याचा फायदा घेत व्यापारी कमी दर देत आहेत.

निवडणुकीपूर्वी 70 लाखांची रोकड जप्त, कार चालकावर कारवाई, एफआयआर दाखल

हमीभावापेक्षा कमी भाव, शेतकऱ्यांचा तोटा
केंद्र सरकारने २०२४-२५ हंगामासाठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली आहे. यंदाच्या हंगामात, मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. पण खासगी व्यापारी त्या पेक्षा कमी भाव देत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

राज्यात कापसाचं उत्पादन चांगलं, पण दर समाधानकारक नाही
राज्यात यंदा कापसाचं उत्पादन चांगलं झालं आहे, परंतु कापसाला मिळणारा भाव अजूनही समाधानकारक नाही. शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे, पण काही छोट्या शेतकऱ्यांना पैशांची तातडीची गरज आहे, म्हणून त्यांना कापूस विकावा लागतोय. खान्देश आणि विदर्भ भागात कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथे जिनिंग मील्स देखील भरपूर आहेत. मात्र, दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *