कोण आहे ‘डॉटर ऑफ द हिल्स’?
कोण आहे ‘डॉटर ऑफ द हिल्स’?
मणिपुरात उभे राहिले संग्रहालय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मणिपूरमध्ये व्हर्च्युअल माध्यमातून ‘राणी गैडिनलियू आदिवासी लढाऊ संग्रहालया ची पायाभरणी केली असून, भारत सरकार १५ कोटींत संग्रहालय बनवणार आहे. पण नक्की कोण होत्या या राणी गायडिन्ल्यु ज्यांनी किशोरावस्थे पासूनच ब्रिटिश हुकूमशाहीचा विरोध करत आले.
राणी गैडिनलिउ यांचा जन्म २६ जानेवारी १९१५ रोजी मणिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यातील नुंगकाओ गावात झाला. बरेच लोक या गावाला लुआंग ओ नावाने सुद्धा ओळखतात. त्यांचे शिक्षण भारतीय परंपरेनुसार झाले. असे म्हणतात की ती नागा जमातीची होती, जी झेलियांगरांगमध्ये येते. १९३० मध्ये, वयाच्या १३ व्या वर्षी, राणी गैडिनलियूने स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. कोसिन आणि हायपो जडोनांग या भावांसोबत ती हेरका चळवळीत सामील झाली.या प्रदेशात नागा राज पुन्हा प्रस्थापित करणे आणि इंग्रजांना त्यांच्या मातीतून हाकलून देणे हे या चळवळीचे ध्येय होतं.
एका रिपोर्ट नुसार, चळवळीची मशाल जाळण्याअगोदरचं , ब्रिटिशांनी जडोनांगला अटक केली आणि त्याला १९ ऑगस्ट १९२१ रोजी इंफाळमध्ये फाशी देण्यात आली. जदोनांगच्या मृत्यूनंतर, चळवळीचा लगाम राणीच्या हातात गेला. गैडिनलिउला आपली संस्कृती, भाषा, मातीचं रक्षण करायचं होतं . ब्रिटीश जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांची जीवनशैली सगळ्यांवर लादत होते.
आपल्या समाजातील लोकांना गांधीवादी विचारसरणीची जाणीव करून देण्यासाठी गैडिनलियू यांनीही पुढाकार घेतला. गैडिनलियूच्या शब्दात, “धर्म गमावणे म्हणजे आपली संस्कृती गमावणे, आपली संस्कृती गमावणे म्हणजे स्वतःची ओळख गमावणे होय.” ब्रिटीश सरकारने लादलेल्या अमानुष कर आणि नियमांच्या विरोधात त्यांनी झेलियनग्रांग कुळातील लोकांना एकत्र करण्यास सुरुवात केली. लोकांनी कोणताही कर भरण्यास नकार दिला. यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध गनिमी कावा सुरू केला.१८ मार्च १९३२ रोजी हंगरुम गावातून जवळपास ५०-६० लोकांनी ब्रिटिश सैनिकांवर हल्ला केला. मात्र, तोफेसमोर भाले, बाण आणि धनुष्य कमजोर झाले. या युद्धानंतर गैडिनलियू भूमिगत झाली .या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इंग्रजांनी राणी गैडिनलियूचा शोध सुरू केला.इंग्रज सरकारने आसाम रायफल्सचे कॅप्टन मॅकडोनाल्ड यांना गाईडिन्लियूला पकडण्यासाठी पाठवले. कॅप्टनला सूचना मिळाली की गैडिनलियू आणि त्याचे साथीदार पुलोमी गावात लपले आहेत. यानंतर इंग्रजांनी गावावर हल्ला केला आणि १७ ऑक्टोबर १९३२ रोजी गैडिनलियूला अटक करण्यात आली. इथून गैडिनलियूला कोहिमा आणि नंतर इम्फाळला नेण्यात आलं . खून, हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याच वेळी, त्याच्या बहुतेक साथीदारांना एकतर फाशीची शिक्षा झाली किंवा तुरुंगात टाकण्यात आलं.
१९३३ ते १९४७ पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राणी गैडिनलिऊ यांना तुरुंगात ठेवण्यात आलं.अटकेनंतर आणि त्याच्या साथीदारांच्या मृत्यूनंतर हेरका चळवळीची ज्योतही विझली. १४ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर भारत स्वतंत्र झाला, तेव्हा राणी गेडिनलिऊ यांनाही स्वातंत्र्य मिळालं. सन १९५२ पर्यंत त्या तुएनसांगच्या विम्राप गावात त्यांच्या लहान भाऊ मारंगसोबत राहत होत्या.१९५२ मध्ये त्यांना गावी परतण्याची परवानगी मिळाली.जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याच वेळी, त्याच्या बहुतेक साथीदारांना एकतर फाशीची शिक्षा झाली किंवा तुरुंगात टाकण्यात आलं.
तुरुंगातून सुटल्यानंतर राणी नी आपल्या लोकांसाठी काम सुरु ठेवलं. स्वतंत्र भारतात राणी नागा राष्ट्रीय परिषदेच्या विरोधात होत्या. ही परिषद नागांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करत होती आणि त्यांना भारतापासून वेगळे करायचं होतं . राणी गैडिनलियूने भारतातच स्वतंत्र झेलियनग्रांग क्षेत्राची मागणी केली. नागा नेत्यांनी राणीच्या मागणीला विरोध केला आणि १९६० च्या दशकात त्यांना पुन्हा भूमिगत होण्यास भाग पाडलं गेलं.१९६५ मध्ये राणीच्या समर्थकांनी नऊ नागा नेत्यांची हत्या केली आणि राणी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. १९६६ मध्ये, भारत सरकारशी चर्चा केल्यानंतर, राणीने अहिंसेचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिला ‘डॉटर ऑफ द हिल्स’ असे संबोधले आणि तिच्या धैर्यासाठी त्यांनी तिला ‘राणी’ ही पदवी दिली.आसाम सरकारने नागा स्वातंत्र्यसैनिकाच्या सन्मानार्थ सिलचरमध्ये एक उद्यान विकसित केले असून त्यात त्यांचा पुतळाही बसवण्यात आला आहे. १९९६ मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केलं आणि २०१५ मध्ये एक स्मारक नाणे देखील जारी केलं .राणी गिडालू हयात असेपर्यंत तिने आपल्या भागातील लोकांच्या हक्कांसाठी लढा दिला.१९८२ मध्ये राणी गैडिनलिऊ यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं .१७ फेब्रुवारी १९९३ रोजी राणीचे निधन झालं.