किरीट सोमय्याच्या यादीत आता धनंजय मुंडेंचे नाव !
किरीट सोमय्या यांनी मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. हसन मुश्रीफ, अनिल परब, मिलिंद नार्वेकर असे अनेक दिग्गज नेते या यादीत आहेत ज्यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपामुळे महाविकास आघाडीतील नेत्याबद्दल जनतेत एक प्रकारे गैरसमज पसरवण्याचे काम सुरु आहे. सोमय्या यांनी आरोप केले की चौकशी संस्था या नेत्यांच्या मागे लागतात हे दिसून आले आहे. या संस्थांची पारदर्शकता हे मोठे प्रश्न चिन्ह ठरत आहे.
आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. की, धनंजय मुंडे यांनी जलमित्र साखर कारखाना उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून १० वर्षांपूर्वी ८३ कोटी रुपये जमा केले. कारखाना अद्याप उभारला नसून तो पैसा, जमीन कुठे गेली? असे सवाल करत सोमय्या विचारतात की, या घोटाळ्याची चौकशी ठाकरे सरकार नि:पक्षपातीपणे करणार आहे का, हे आधी सरकारने स्पष्ट करावे,
मुंडे यांच्यावर आरोप आणि त्याचा खुलासा सरकारने करावा असे म्हणत त्यांनी मुंडे यांना आणि पर्यायाने सरकारला आव्हान दिले आहे. साखर कारखाना उभा करण्याच्या नावावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांची फसवणूक केली असून ज्यांनी जमिनी दिल्या नाहीत अशा मृत व्यक्तीच्या सह्या घेऊन जमिनी लाटल्या आहेत. हा सगळा घोटाळा उघडकीस यायला हवा. या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तपास करण्याचे आदेश दिले असून मी स्वत: ईडीकडे तक्रार केली आहे.
हे प्रकरण बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मी या ठाण्यात जाऊन घोटाळ्याची चौकशी का होत नाही याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. बर्दापूर पोलिसांची चौकशी करण्याची मनस्थिती दिसत नाही. मी थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार करणार असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.