महाराष्ट्रराजकारण

संजय राऊत यांच्या आरोपावर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया

Share Now

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तसेच पीएमसी बँक घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे देखील सांगितले.

संजय राऊत यांनी केलेले सर्व आरोप किरीट सोमय्या यांनी फेटाळून लावले, असून कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विट करून सांगितले. माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत कोहिनूर सेंटर घोटाळ्याबाबत का बोलत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तसेच २०१७ साली सामनातून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे माझी पत्नी डॉक्टर मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. आता माझ्या मुलाचं नाव घेतला आहे. ठाकरे सरकारने माझ्या विरोधात दहा खटले दाखल केले आहेत तर अजून तीन खटले पाईपलाईनमध्ये आहेत त्यांची परिस्थिती समजते यांची एका प्रकरणात स्वागत करतो आम्ही काही चूक केली नाही. कोणत्याही भ्रष्टाचार व्यवहारातून आलेलो नाही. असे किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *