क्राईम बिटमहाराष्ट्र

सुनेने केला सासूचा गोळ्या झाडून खून, कारण वाचून तुम्ही व्हाल थक्क

Share Now

यवतमाळ : सासू पूजा करीत असतानाच सुनेने सासूवर गोळी झाडली. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावातून हा प्रकार समोर आला. गावातील पोरजवार कुटुंबातील सासू-सुनांमध्ये वाद होता. त्यामुळे सुनेने सासूचा खून केला. अशी कबुली देखील सून सरोज पोरजवार हिने दिला. अनेक दिवसं पासून पोरजवार कुटुंबातील सासू सुनेत वाद होता. तरी दोघी एकत्र राहत होत्या.

सासू आशा, सरोज, नवरा अरविंद आणि अरविंदचा भाऊ मंगेश हे सर्व सोबतच राहतात. अरविंद आई सोबत भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. दोघींचा खुप दिवसं पासून वाद सुरु होता याच रागातून सरोजने शेजारील निवृत्त जेलर यांची बंदूक चोरून त्याच बंदुकीने सासू पूजा करत असताना सरळ डोक्यात डोली घालून हत्या केली. येवेळी त्या दोघी घरात एकट्याच होत्या.

दरम्यान खानाच्या काहीवेळ पूर्वी हमाल भाजी पाला देण्यासाठी आला होता त्यावर आशा त्याला पूजा करून हिशोबाचे पैसे देते असे म्हंटली होती. त्या मुळे हमाल बाहेरच थांबला. फारवेळ उभा राहूनही कोणी बहर न आल्याने हमाल भाजी तेथेच ठेऊन निघून गेला. मात्र तो उभा होता तेव्हा त्याला बंदुकीचा आवाज आला मात्र त्याला ती बाब कळली नाही कि आवाज कश्याचा. जेव्हा आशाच्या मृत्यूची बातमी सगळ्या गावात पसरली तेव्हा हि बाब हमालाने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी सरोजला विचारणा केली असता तिने गुन्हयांच्यी काबुली दिली. या प्रकरणी पुढील तपस सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *