काय आहे संविधान दिनाच महत्व
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र मिळाले तरी देखील भारतातील परिस्तिथी लोकांची मानसिकता जातीय तेढ आणि सामाजिक विषमता कायम होती, प्रत्येक राष्ट्र किंवा देश एका तत्वावर चालवला जातो, आपला देश देखील लोकशाही , धर्म निरपेक्ष मार्गाने चालावा यासाठी भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती, यासाठी एक समिती नेमण्यात आली होती, यात बँरिस्टर, वकील, घटनातज्ञ , राजकीय आणि सामाजिक नेते, विचारवंत दलित मुस्लिम सर्वच घटकातील प्रतिनिधिचा समावेश होता. संविधान तयार करण्यास एकूण दोन वर्षे ११ महिने १८ दिवस लागले.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान अधिनियमित होऊन स्वत: प्रत अर्पित झाले , आणि २६ जानेवारी १९५० म्हणजे दोन महिन्यानंतर भारतात गणराज्य सुरू झाले आणि आपण सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष झालो.
भविष्यात देखील राज्यघटनेचे महत्व स्वातंत्र्य, समता , बंधुता न्याय, धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि लोकशाही घटनेने मानलेली आधारभूत तत्व आणि संविधानिक मूल्य याबद्दल जागरूकता राहावी यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरी करण्यात यावा असे आदेश काढले आणि आपल्याकडे हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरी करत आहोत.