कर्जबाजारी होतेय देशातील जनता; नवीन वर्षांतील चिंता
देशात कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घरांसाठी, उद्योगांसाठी, शेती, प्लॉट घेण्यासाठी व्यावसायिक लोन अशा सर्व लोनसाठी आणि शिक्षणासाठी बँकेतून कर्ज घेण्यात येते. परंतु आता बँकांना फसवण्याचे प्रकार भरपूर प्रमाणात वाढल्याचे दिसतंय. प्लॉट विक्री मध्ये फसवणूक, बँकेतून कर्ज काढून फसवणूक, अशा बऱ्याच घटना सतत उघड होताना दिसत आहे. अशीच एक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाळूज येथे राहणाऱ्या नवरा बायकोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्योग उभारण्यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बँकेकडून कर्ज घेऊन बायकोच्या नावावरील सात प्लॅट गहाण ठेवले आहे. आणि नियमानुसार करार करून कोटींचे कर्ज या व्यवसायिकाने उचलले आहे. त्याचबरोबर या व्यावसायिकांवर कर्ज असतानाही त्याने सर्व प्लॉट विकून टाकले. हे प्रकरण कर्ज खात्याच्या नूतनीकरणाच्या वेळी गहाण मालमत्तांचे निरीक्षण करताना उघड झाले आहे. त्यानंतर महाप्रबंधक मनोजकुमार सिंग यांनी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब तात्याराव पाथ्रीकर असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची २ कोटी ६४ लाखांची फसवणूक केली आहे. पाथ्रीकर यांचा त्रिमूर्ती सिमेंट प्रॉडक्ट्स नावाचा व्यवसाय आहे. २०२१ मध्ये कर्जाची मागणी केली होती. त्यानंतर ८० लाख रुपये टर्म लोन आणि ४० लाख कॅश क्रेडिट मधून दिले आणि बायकोच्या नावावर असलेले वडगाव औद्योगिक वसाहती येथील सात प्लॉट आणि कचनेर रस्त्यावरील ८१ आर क्षेत्रफळ जागा देखील गहाण ठेवली होती. २०१४ मध्ये त्रिमूर्ती एंटरप्राईजेस फर्मसाठी कॅश क्रेडिट १ कोटी ५० लाख रुपये एवढे कर्ज घेतले होते. आणि २०१६ मध्ये त्यांच्या पत्नीसह त्रिमूर्ती सिमेंट प्रॉडक्ट्स सुरु केले आणि क्रांती चौक येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या क्रांती चौक शाखेत करंट खाते देखील उघडले. त्यानंतर बँकेने कॅश क्रेडिट 2 कोटी २० लाख रुपये लोन मंजूर केले. त्यानंतर सीजीईसीएल योजनेतून उद्योगांना चालना देण्यासाठी
बँकेने ही योजना काढली होती. नंतर त्यांनी पुन्हा २० टक्के टर्म लोन साठी अर्ज भरून ४४ लाख रुपये अजून टर्म लोन घेतले.
बँकेच्या नियमानुसार ओव्हरड्राफ्ट अकाउंटचे नूतनीकरण अपूर्ण असल्यामुळे बँकेच्या वकील ऍड. सीमा राजपूत यांनी पाहणी केली असता, त्यात पाथ्रीकर यांनी गहाण ठेवलेल्या वडगाव कोल्हाटी येथील मालमत्तेची बँकेच्या संमतीविना विक्री केल्याचे उघडकीस आले. या गहाण ठेवलेल्या जागेवर खरेदी केलेल्या लोकांनी बांधकाम सुद्धा सुरू केलेले आहे. यावेळी लक्षात आले की, जमा केलेली कागदपत्रे हे खोटी असून २ कोटी ६४ लाखांची फसवणूक झाली आहे.