राजकारण

जयंत पाटील यांनी छगन भुजबळांच्या पुस्तकावर केली प्रतिक्रिया; मोदींच्या वक्तव्यावरही साधला निशाणा

अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपसोबत महायुतीत सामील झाल्याने सगळ्यांना आनंद झाला, असं छगन भुजबळ यांनी ‘2024 : द इलेक्शन सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकात म्हटलं आहे. भुजबळ यांनी त्यांच्या पुस्तकात खुलासा करताना सांगितलं की, ईडीच्या चौकशीपासून सुटका मिळाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि भाजपसोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, की भुजबळ साहेबांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसतंय की, त्यांना तिकडून संरक्षण मिळालं. त्यामुळे त्यांचे भाजपसोबत जाण्याचे खरे कारण आता सर्वांना कळालं आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही केले स्पष्ट,”चार पिढ्या आली तरी कलम ३७० परत मिळणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या विधानावरही जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी मोदींवर आरोप केला की, समाजात विघटन निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. समाज एकत्र राहण्यापेक्षा त्यांना समाजात फूट घालायची आहे. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम समाज समजूतदार आहे, आणि ते निवडणुकीत “पोळी भाजण्यासाठी” अशा भाषेचा वापर करतात. महाराष्ट्रातील जनतेचे खरे प्रश्न महागाई, महिला अत्याचार आणि प्रगती असायला हवे, पण भाजप यावर बोलण्याऐवजी विभाजनकारक मुद्दे मांडत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

शिराळ्यातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले. यावर जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भाजपसोबत संरक्षण मिळवण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे ते आता भाजपच्या निर्णयावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. भाजपला येत्या निवडणुकीत विजय मिळण्याची शक्यता कमी आहे, आणि जर भाजप जिंकला, तर फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा मानस असल्याचे शाह यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *